विरार : विरार-केळवे स्थानकादरम्यान दोन हजारी प्रवासी अडकले
Continues below advertisement
मुसळधार पावसाने विरारजवळ खोळंबलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये सुमारे 24 तासांनंतरही 2 हजार प्रवासी अडकल्याची माहिती समोर आली आहे... गुजरात मेल, सौराष्ट्र मेल, अवंतिका एक्स्प्रेस, जयपूर एक्स्प्रेस आणि दुरांतो एक्स्प्रेसचे हे प्रवासी आहेत....
विरार आणि केळवा रोड स्थानकांदरम्यान मुंबईकडे जाणाऱ्या आणि गुजरातकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमधल्या काही प्रवाशांनी एबीपी माझाशी संपर्क साधला... आणि ही माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवण्याची विनंती केली...
स्थानिक लोकांनी त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली असली तरी, पाणी ओसरत नसल्याने सुटका कधी होणार याची चिंता त्यांना भेडसावत आहे...
त्यात आता रात्र झालेली असल्यानं आजची रात्रही त्यांना रेल्वेतच काढावी लागण्याची शक्यता आहे...
((दरम्यान गुजरातला जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक स्पेशल ट्रेन पाठवली जाणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.. पण त्याची वेळ अजूनही नक्की करण्यात आलेली नाही...)) दुसरीकडे मुंबईला येणाफऱ्या प्रवाशांसाठी 6 एसटी बसेस आणि 5 खाजगी बसेसची सोय करण्यात आल्याचं कळतंय..
Continues below advertisement