विरारमध्ये दुहेरी हत्याकांडानं खळबळ, 15 ते 20 किमी अंतरावर वडील-मुलाचा मृतदेह
Continues below advertisement
विरार पूर्वमध्ये बापलेकाच्या हत्येनं खळबळ माजली आहे. काल सायंकाळी मुलाचा तर आज दुपारी वडिलांचा मृतदेह पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर सापडला. चंद्रकात करगल असं वडिलांचं नाव असून हर्ष करगल असं मुलाचं नाव आहे. ते दोघेही पूर्व सहकार नगरमधील ओम अपार्टमेंन्टमध्ये राहत होते. 25 सप्टेंबरला वडिल आणि मुलगा दोघेही बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात नोंदवण्यात आली. मंगळवारी दहिसर गावच्या तलावात हर्षचा मृतदेह सापडला, तर म्हाडा कॉलनीच्या मोठ्या नाल्यात चंद्रकात करगल यांचा मृतदेह आढळला. दोन्ही मृतदेहांच्या तोंडाला सेलोटेप लावली होती आणि हात दोरीनं बांधले होते. हत्या अनैतिक संबध किंवा अर्थिक व्यवहारातुन झाली असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला. पुढील तपास पोलिस करत आहेत.
Continues below advertisement