मुंबई : अवांतर वाचनाच्या पुस्तकांमध्ये कोणतीही अश्लिल भाषा नव्हती - तावडे

Continues below advertisement
शालेय विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठी निवड करण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये आक्षेपार्ह मजकूर असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत विखे पाटलांनी या पुस्तकांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

या पुस्तकांमध्ये कौमार्यभग्न, पुत्र संतती, इंद्रियसुख असे आक्षेपार्ह आणि शालेय विद्यार्थ्यांना जड जातील, असे शब्द असल्याचा दावा विखेंनी केला आहे. त्यामुळे आधीच पुस्तकांच्या खरेदीवरून वादात असणारं शिक्षण खातं नव्या वादात सापडलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram