मुंबई: आरक्षण वादावर विलासराव देशमुख यांचा तोडगा, दहा वर्षांपूर्वीचं भाषण व्हायरल
गेल्या काही वर्षांपासून आरक्षण प्रश्नाने डोकं वर काढलं आहे. पण ‘एबीपी माझा’च्या कार्यक्रमात काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी दहा वर्षांपूर्वी एक भाषण केलं होतं, ते भाषण आजही विचारप्रवर्तक आणि दिशादर्शक आहे.
‘माझा महाराष्ट्र ट्वेण्टी ट्वेण्टी’ या कार्यक्रमात विविध पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्राबाबतचं व्हिजन मांडलं होतं. त्यावेळी मंचावर भाजप नेते गोपीनाथ मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर आर पाटील, शिवसेना नेते मनोहर जोशी आणि ज्येष्ठ पत्रक गिरीश कुबेर उपस्थित होते.
याच कार्यक्रमातील विलासराव देशमुखांच्या भाषणाची क्लीप सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. विलासराव देशमुखांचा सुपुत्र आणि अभिनेता रितेश देशमुखने स्वत: ही क्लिप ट्विट केली आहे.