मुंबई : विद्याविहारमध्ये शौचखड्ड्यात पडून एकाच्या पायाला गंभीर दुखापत
Continues below advertisement
मुंबईतल्या विद्याविहार भागात असलेल्या बंजारा वस्तीमध्ये शौचास गेलेले नारायण बदगी हे शौचकूप खचून आत पडल्याची घटना घडली आहे. शौचालयाचं दार बंद केल्यानंतर जर्जर झालेलं शौचकूप खचलं आणि नारायण थेट आठ फूट खोल असलेल्या टाकीत कोसळले. त्यानंतर स्थानिकांनी त्यांना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.
Continues below advertisement