Vidhansabha | विधानसभा निवडणुका 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान, चंद्रकांत पाटलांचं भाकीत | ABP Majha

राज्यात विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये होणार असल्याचं भाकीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. येत्या 15 सप्टेंबरपासून राज्यात आचारसंहिता लागेल आणि 15 ते 20 ऑक्टोबर दरम्यान राज्यात निवडणुका होतील असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी आज पिंपरीमध्ये आयोजित कार्यक्रमात बारामती जिंकण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट केलं आहे.

येत्या विधानसभेला अजित पवारांना पराभूत करु असं म्हटलं तर तुम्हाला हसू येईल, पण बारामती विधानसभा जिंकण्यासाठी प्रयत्नशील राहू असंही पाटील म्हणाले. पुण्याच्या पालकमंत्रिपदी चंद्रकांत पाटलांची नियुक्ती झाल्यानंतर ते पहिल्यांदाच पुणे दौऱ्यावर होते.

JOIN US ON

Whatsapp
Telegram