मुंबई : ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं निधन
ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं निधन झालं. मुंबईतील राहत्या घरी अरुण दाते यांनी वयाच्या 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रविवारी पहाटे सहा वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून अरुण दाते यांची प्रकृती खालावली होती. सध्या अरुण दाते मुलगा अतुल दाते यांच्यासोबत राहत होते. रविवारी पहाटेच्या सुमारास मुंबईतील कांजुरमार्गमधील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी भावसंगीतातील शुक्रतारा निखळल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.