Actor Viju Khote Passes Away | ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं वयाच्या 78 व्या वर्षी निधन | ABP Majha
ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं वृद्धापकाळानं दक्षिण मुंबईतील राहत्या घरी निधन झालं. ते 78 वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. विजू खोटे यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. विजू खोटे यांच्या पार्थिवावर आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.