Narali Purnima 2019 | वसई-विरारमध्ये नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा | ABP Majha
Continues below advertisement
वसई-विरार पट्ट्यातही नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अर्नाळा बंदारत कोळी बांधवांनी पारंपारिक पेहराव घालून, गावातून मिरवणूक काढली होती. वाजत गाजत मानाचा सोन्याचा नारळ आपल्या मायबाप असलेल्या दर्यासागराला अर्पण करत भरघोस म्हावरं जाळ्यात गावण्याची विनंती त्यांनी यावेळी केली आहे. कोळीवाड्यात पारंपारिक वेशात कोळी नृत्ये सादर करण्यात आली..नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ अर्थात नारळाला सोनेरी कागदाचं वेष्टन लावून सजवलेला नारळ समुद्रात विधिवत सोडला जातो. त्यानंतर कोळी बांधव भर समुद्रात मासेमारीला निघतात.
Continues below advertisement