वसई : पूर्व भागातील मिठागरात 400 लोक अडकले, सुटकेसाठी प्रशासनाचे प्रयत्न

Continues below advertisement
वसई पूर्व भागात असलेल्या मिठागारातील वस्ती पुरानं वेढलेली असतानाही 400 जणांनी घरं सोडण्यास नकार दिलाय...
या लोकांच्या सुटकेसाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, या वस्तीच्या चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. होड्यांचा आधाराने त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र तिथले लोक आपली घरं सोडून यायला तयार नाहीत. त्यामुळे बचावकार्यात अनेक अडचणी येत आहेत. आपत्ती व्यवस्थापन कक्ष अधिकारी आणि तहसीलदार यांनी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, संध्याकाळ होत आली असताना लोकांनी बाहेर पडण्यास दिलेल्या नकारानं बचावकार्य कसं करायचं असा प्रश्न आता प्रशासनाला पडलाय. दरम्यान, एबीपी माझाची टीम घटनास्थळी दाखल झाली असून, लोकांना समजावण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram