वसई : माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये हाणामारी, दोन गटांच्या भांडणात पोलिसांनाच मारहाण
वसईच्या माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये हाणामारीची घटना घडलीय. ४० ते ५० जणांच्या जमावाने पोलिसांवर हल्ला केला. दोन गटात हाणामारी झाल्यानंतर तक्रार देण्यासाठी दोन्ही गट पोलिस ठाण्यात आले. आणि या गटाने पोलीस स्टेशन मध्ये देखील हाणामारी केली. मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर ही या गटाने हल्ला केला. पोलीसांनी याप्रकरणी ५ ते ६ जणांना ताब्यात घेतले आहे. १५ मोटरसायली ही जप्त केल्या आहेत.