वसई : महाराष्ट्र बंददरम्यान अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या स्कूलबसला पोलिस संरक्षण
दरम्यान वसईच्या फादरवाडीमध्ये विद्याविकासनी शाळेतील विद्यार्थी काल शाळेतच अडकल्याने शाळा प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी सुखरुप घरी पोहोचतील का? याची शाळा व्यवस्थापण आणि पालकांना चिंता होती. मात्र शाळा व्यवस्थापनाकडून ही हकीकत वालिव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय हजारे यांना सांगितली. नंतर हजारे यांनी क्षणाचाही विलंब न करत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांच्या स्कूलबसला पोलीस संरक्षण दिले. पोलिस निरीक्षीकांची स्वत:ची गाडी आणि मध्ये शाळेच्या 15 गाड्या असं संरक्षण देत विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापर्यंत सुखरुप पोहोचवण्यात आले.