वसई : चार्जिंग सुरु असताना ओप्पो मोबाईलचा स्फोट
वसईत राहणाऱ्या दिनानाथ दुबे यांच्या ओपो मोबाईलचा अचानक स्फोट झाल्याने खळबळ माजली आहे. काल दुपारी चार्जिंगला लावलेल्या असताना या मोबाईलमधून आधी धूर निघणं सुरु झालं. त्यानंतर मोबाईलचा स्फोट झाला. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. एक वर्षापूर्वी त्यांनी हा मोबाईल खरेदी केला होता. महत्वाचं म्हणजे या मोबाईलमध्ये कोणताही बिघाडही झालेला नव्हता. त्यामुळे तुम्हीही आपला मोबाईल वापरताना काळजी घेणं गरजेचं आहे.