वसई : आत्महत्या नव्हे हत्याच, मृत मुलाच्या न्यायासाठी आई रस्त्यावर उतरली
Continues below advertisement
मुलाच्या न्यायासाठी विरार मध्ये एक आई रस्त्यावर उतरलीये. 14 जानेवारी रोजी नितीन भगत याचा अर्नाळा समुद्र किना-यावर संशयास्पद मृतदेह सापडला होता. नितीन याची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला होता. या घटनेला एक महिना झाला तरी नितीनच्या मृत्यूचा तपास योग्य रित्या होत नसल्याच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात आला होता. हत्येचा गुन्हा दाखल करुन आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी नितीनच्या आईने केलीये.
Continues below advertisement