वसई : अनधिकृत चाळींविरोधात मनसे आक्रमक, तहसीलदार कार्यालयात घोषणा, कार्यकर्ते ताब्यात
Continues below advertisement
वसईतल्या अनधिकृत चाळींच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. वसईत तहसिलदारांच्या कार्यालयात मनसे कार्यक्रत्यांनी ठिय्या मांडून अनधिकृत चाळींवर कारवाईची मागणी केली.
वसईतल्या राजीवली वाघरालपाडा परिसरात डोंगर भूईसपाट करुन परप्रांतियांनी चाळी उभ्या केल्या आहेत. महत्वाचं म्हणजे इथं वन विभागाची 6 हजार एकरा आणि आदिवासींसाठी आरक्षित जागा आहे. मात्र महसूल आणि पोलीस खात्याला खिशात ठेवून परप्रांतियांनी इथं अतिक्रमण केलं आहे. त्यांना स्थानिक बिल्डरांचंही पाठबळ मिळतंय. एबीपी माझानं दाखवलेल्या या बातमीबाबत कालच्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी सरकारचं लक्ष वेधलं. आणि कारवाईची मागणीही केली.