वसई : बाळासाहेबांची शिवसेना, आताची शिव'विरोध'सेना : मुख्यमंत्री
शिवसेनेने व्हायरल केलेल्या कथित वादग्रस्त ऑडिओ क्लिपबद्दल मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं. व्हायरल झालेली ती ऑडिओ क्लिप माझीच होती. पण शिवसेनेने ती अर्धवट ऐकवली. पराभव समोर दिसू लागल्यामुळंच हे सगळं सुरू असून निवडणूक आयोगाने आता अर्धवट क्लिप ऐकवणाऱ्यांवरच कारवाई करावी,' अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. वसईत आज झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण प्रकरणावर खुलासा केला आहे. पण यात ऑडिओ क्लिपमुळे शिवसेना आणि भाजपचे संबंध पुन्हा एकदा दुरावले आहेत.