वसई : आगीत चौधरी इंटरनॅशनल कंपनी खाक, एका कर्मचाऱ्याचा मृत्यू
Continues below advertisement
वसईत आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या चौधरी इंटरनॅशनल कंपनीत एका कर्मचाऱ्याचा मृतदेह हाती लागला आहे. आज पहाटे चार वाजता ही आग लागली होती. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. यासाठी वसई विरार अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आगीत कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. ही कंपनी लेदरचे चप्पल बनवण्याचे काम करते.
Continues below advertisement