वसई : वसईतील चिंचोटी धबधब्यावर 40 जण अडकलेल्या पर्यटकांची सुटका, एकाचा मृत्यू

Continues below advertisement
वसईच्या चिंचोटी धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांची सुटका करण्यात प्रशासन आणि एऩडीआरएफच्या टीमला अखेर यश आलंय. जवळपास १०७ पर्यटक इथं अडकले होते, अशी माहिती पोलिसांनी दिलीय.  सततच्या पावसानं पाण्याचा प्रवाह वाढला आणि अनेक ठिकाणी पर्यटक अडकून पडले होते. यातील काही पर्यटक स्वत: सुखरुप बाहेर पडले. मात्र, 27 जण अडकून पडले होते. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून त्यांचा शोध सुरु करण्यात आला आणि अडकलेल्या पर्यटकांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. दरम्यान,भावेश गुप्ता या पर्यटकाचा मृत्यू झाला असून, त्याची ओळख अद्याप पटलेली नाही. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram