वसई : वसईतील चिंचोटी धबधब्यावर 40 जण अडकले
Continues below advertisement
पावसाचा जोर वाढल्यामुळे वसईतील चिंचोटी धबधब्यावर पोहायला गेलेले पर्यटक वरतीच अडकले. यातील सर्व 20 जणांना वाचवण्यात यश आलं आहे. मात्र दुर्दैवाने एक जणाचा यामध्ये मृत्यू झाला आहे. धोकादायक ठिकाणी असलेल्या यापैकी पाच जणांना हेलीकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं. तर पाण्याचा वेग कमी झाल्यानंतर काही जण बाहेर पडले. चिंचोटी धबधब्यावर पायी जाण्यासाठी दोन तास लागतात. त्यामुळे वसईच्या तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे हेलिकॉप्टरची मागणी केली. या सर्वांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुटका करण्यात आली.
Continues below advertisement