स्पेशल रिपोर्ट : वसई : तोल जाऊन पडल्याने टँकरखाली चिरडून चिमुरड्याचा मृत्यू
Continues below advertisement
उशीर झाला म्हणून शाळेने प्रवेश नाकारला. त्यामुळे गोविंद घाडी आणि त्यांचा मुलगा निषाद घराकडे निघाले. वाटेत गोविंद काही कामासाठी एका दुकानावर थांबले, तर निशाद बाईकजवळच थांबला. मात्र त्याच वेळात होत्याचं नव्हतं झालं.
निषादचा तोल जाऊन तो रस्त्यावर पडला आणि अनवधानानं टँकरच्या चाकाखाली आला. सगळ्यांची धावपळ सुरु झाली. निषादला रुग्णालयातही नेलं, पण त्याचे प्राण वाचू शकले नाहीत.
कुठल्या हॉस्पिटलकडे निषादवर उपचार करण्यासाठी आवश्यक ती मेडिकल सामग्री नव्हती तर कुणाकडे डॉक्टरच उपलब्ध नव्हते. निषादच्या आईने मात्र डॉक्टरांनीच दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे.