वसई : रेल्वे स्टेशनवर मोबाईल चार्जिंगसाठी सीसीटीव्हीचे प्लग काढले
Continues below advertisement
वसई स्टेशनवर मोबाईल चार्ज करणं 17 जणांना चांगलचं महागात पडलंय.
पावसाच्या प्रलयामुळे वसईत तब्बल 30 तास वीज गायब होती. परिणामी बहुतांश जणांचे मोबाईल चार्जींग अभावी बंद होते. मग काय तरुणांनी आपले मोबाईल चार्ज करण्यासाठी थेट स्टेशन गाठलं. माञ काही पट्ट्यांनी चक्क स्टेशनवरील सीसीटीव्ही कॅमे-याचे प्लग काढून आपले मोबाईल चार्ज केले. याप्रकरणी 17 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. रेल्वे कोर्टाने या 17 जणांना 200 रुपयांचा दंड ठोठावलाय. तसेच रेल्वेची सुरक्षा धोक्यात आणल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आलाय.