वाराणसी : जेव्हा नरेंद्र मोदींच्या ताफ्यापुढे बैलांची झुंज रंगते!
Continues below advertisement
पंतप्रधान मोदींचा ताफा चक्क दोन बैलांच्या भांडणामुळे काही काळ थांबवावा लागला. मोदी वाराणसीच्या दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला. परवा रात्री दौऱ्यानंतर मोदींच्या वाहनांचा ताफा केंट रेल्वे स्टेशनकडे निघाला होता. मात्र त्यादरम्यान वाटेतच दोन बैलांची झुंज झाली. अखेर उपस्थित पोलिसांनी बैलांना बाजूल केलं. त्यानंतर मोदी आणि त्यांचे इतर सुरक्षारक्षकांची वाहनं पुढे निघाली.
Continues below advertisement