वलसाड : भजन कार्यक्रमात 50 लाख उधळले, गुजरातमधील व्हिडीओ व्हायरल
Continues below advertisement
वलसाड : गुजरातच्या एका भजन कार्यक्रमात लोकांनी तब्बल 50 लाख रुपये उधळले आहेत. सोशल मीडियात हा व्हीडिओ व्हायरल झाला. एकीकडे एटीएममध्ये पैशांचा खडखडाट असताना दुसरीकडे 50 लाखांचा पडलेला पाऊस यावर उपस्थित प्रेक्षकही अवाक झाले.
महत्वाचं म्हणजे उधळण्यात आलेले पैसे नव्या स्वरुपातील 200 आणि 500 च्या नोटा होत्या. अवघ्या काही मिनिटातच या नव्या नोटांनी हे संपूर्ण स्टेज भरुन गेलं. कलवाडा गावात गायक ब्रिजराजदान आणि लोकगायिका गीता रबारी यांच्या कार्यक्रमात हे पैसे उधळण्यात आले.
गुजरातमध्ये कार्यक्रमात पैसे उधळणं ही एक फॅशनच झाली आहे. काही दिवसांपूर्वीही देशातील दहा राज्यांमधील एटीएममध्ये खडखडाट असताना पैसे उधळण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.