भंडारा : कर्जबाजारीपणाला कंटाळून वाहीमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
Continues below advertisement
भंडारा जिल्ह्यातल्या वाही गावात एका ३७ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. सोमेश्वर कुकडे असं या शेतकऱ्याचे नाव आहे.कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतात गळफास घेत त्यानं ही आत्महत्या केली. कुकडेंवर सेंट्रल बँक ऑफ इंडियाचं 75 हजारांचं कर्ज होतं. कर्जमाफीचा लाभ न मिळाल्यामुळे आत्महत्या केल्याचा आरोप कुकडे कुटुंबियांनी केला. महसूल विभागाकडून कसलाही प्रतिसाद न मिळाल्यामुळे कुटुंबियांनी मृतदेह तहसील कार्यालयात आणून ठेवला होता. यामुळं तहसील कार्यालयात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
Continues below advertisement