
लखनऊ : उत्तरप्रदेशात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला भगवा रंग दिल्याने वाद
Continues below advertisement
उत्तर प्रदेशमधील बदायूं जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला भगवा रंग दिल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता बाबासाहेबांच्या पुतळ्याला निळा रंग देण्यात आलाय. बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष हेमेंद्र गौतम यांनीच निळा रंग देण्याचं पाऊल उचललं. भगव्या रंगातल्या पुतळ्याचं जेव्हा लोकार्पण करण्यात आलं तेव्हा हेमेंद्र गौतम उपस्थित होते. पण त्यानंतर टीकेला सामोरं जावं लागल्यानंतर गौतम यांनी हे पाऊल उचललं.
Continues below advertisement