उत्तर प्रदेश : संत कबीर समाधीस्थळाच्या दर्शनावेळी योगी आदित्यनाथांचा टोपी घालण्यास नकार
Continues below advertisement
पंतप्रधान मोदी आज उत्तर प्रदेशातल्या संत कबीरनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र त्याआधीच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरुन वाद सुरु झाला आहे. मोदींच्या दौऱ्याआधी योगी संतकबीरनगर जिल्ह्यात पाहणीसाठी आले. यावेळी संत कबीर यांच्या समाधीस्थळाचं त्यांनी दर्शनही घेतलं. मात्र तिथे योगी आदित्यनाथ यांना देऊ केलेली टोपी त्यांनी नाकारली.
Continues below advertisement