उत्तर प्रदेश : व्हॉट्सअॅपवरुन तलाक, अलिगड विद्यापीठातील प्राध्यापकावर पत्नीचा गंभीर आरोप
Continues below advertisement
उत्तर प्रदेशच्या अलिगड विद्यापीठातल्या प्राध्यापकानं व्हॉट्स ऍपवरून ट्रिपल तलाक दिल्याचा आरोप होतो आहे. प्राध्यापकाच्या पत्नीनं यासंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून तक्रार केली आहे. दरम्यान काही महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं मुस्लिम धर्मातील तोंडी तलाक पद्धतीवर बंदी घातली आहे.
Continues below advertisement