उत्तर प्रदेश : फतेहपूर सिक्रीमध्ये स्विस जोडप्याला जबर मारहाण
Continues below advertisement
भारत सरकारच्या 'अतिथी देवो भव' अभियानाला उत्तर प्रदेशातील फतेहपूर सिक्री शहरात गालबोट लागलं आहे. भारतात फिरण्यासाठी आलेल्या स्विस जोडप्यासोबत एक अशी घटना घडलीय, ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केली नसेल. फहेतपूर सिक्रीमध्ये या जोडप्याला स्थानिक तरुणांनी दगड आणि काठ्यांनी मारहाण केली. स्वित्झर्लंडच्या लुजानेमध्ये राहणाऱ्या या जोडप्यावर हल्ला झाला. रक्ताने माखलेले हे परदेशी पर्यटक रस्त्यावर पडले होते आणि येणारे-जाणारे व्हिडीओ बनवण्यात व्यस्त होते.
Continues below advertisement