
उत्तर प्रदेश : बसपाध्यक्षा मायावतींचा राज्यसभेचा मार्ग मोकळा
Continues below advertisement
बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांचा राज्यसभेवर जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे. कारण उत्तरप्रदेशमधील दोन जागांसाठीची पोटनिवडणूक आणि राज्यसभेपुरता बसपा आणि समाजवादी पक्षात समझोता झाल्याची माहिती खुद्द मायावती यांनी दिली आहे. पोटनिडवणुकीत बसपा आपले उमेदवार देणार नाही. तर भाजपाचा पाडाव करण्यासाठी अन्य तुल्यबळ उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहनही मायावती यांनी बसपा कार्यकर्त्यांने केलं आहे. यापार्श्वभूमीवर दोन्ही पक्षात 2019 च्या निवडणुकांमध्ये युती होणार असल्याचा चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, मायावती यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
Continues below advertisement