लखनऊ : भीमराव रामजी आंबेडकर लिहा, यूपी सरकारचा अध्यादेश, राम नाईक यांचं स्पष्टीकरण

उत्तर प्रदेशातील सर्व राजकीय रेकॉर्डमध्ये आता भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या नावात ‘रामजी’ जोडलं जाणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने ‘डॉ. भीमराव आंबेडकर’ यांचं नाव बदलून ‘डॉ. भीमराव रामजी आंबेडकर’ करण्यासाठी, सर्व विभाग आणि अलाबाहाद-लखनौमधील हायकोर्टाच्या सर्व खंडपीठांना आदेश दिले आहेत.

“संविधानाच्या पानांमध्ये बाबासाहेब यांची डॉ. भीमराव रामजी आंबेडकर नावाने स्वाक्षरी आहे. राज्यपाल राम नाईक यांनी डिसेंबर 2017 मध्ये ह्या अभियानाला सुरुवात केली होती. राम नाईक यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि महासभेला पत्र लिहून आंबेडकरांच्या नावाचा योग्य उच्चार आणि योग्य नाव लिहिण्याकडे लक्ष वेधलं होतं,” असं बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर महासभेचे संचालक डॉ. लालजी प्रसाद निर्मल यांनी सांगितलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola