उत्तर प्रदेशमधील शामलीमध्ये साखर कारखान्यात गॅस गळती, 300 हून अधिक मुलं अत्यवस्थ
Continues below advertisement
गोरखपूरमध्ये ऑक्सिजनअभावी मुलांच्या मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, उत्तर प्रदेशातल्या शामली भागात एक मोठी दुर्घटना घडली आहे. एका साखर कारखान्यातून बाहेर पडलेलं वेस्टेज नष्ट करण्यासाठी सोडलेल्या गॅसमुळे तब्बल 500 पेक्षा अधिक मुलं अत्यवस्थ झाली आहेत.
शामलीतील सरस्वती विद्यामंदीर शाळेतली ही सर्व मुलं आहेत. ज्याठिकाणी हे केमिकल टाकण्या आलं, त्यापासून अगदी काही अंतरावर ही शाळा होती. दुपारच्या सुमारास साखर कारखान्यातील कचरा नष्ट करण्यासाठी टाकण्यात आलेल्या केमिकलचा गॅसमुळे मुलं बेशुद्ध झाली. याप्रकरणी साखर कारखान्यातील सुपरव्हायझरचा हलगर्जीपणा जबाबदार धरलं जात आहे.
Continues below advertisement