Uttam Bandu Tupe | ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपेंना अखेर हक्काचं घर मिळालं | पुणे | ABP Majha
ज्येष्ठ साहित्यिक उत्तम बंडू तुपेंना अखेर हक्काचं घर मिळालं आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर यांच्या हस्ते त्यांना घऱाची चाबी देण्यात आली. पक्षाघातामुळे तुपे पती-पत्नी बोलू शकत नाहीत पण आयुष्याच्या उत्तरार्धात का होईना त्यांच्या आजवरच्या कार्याची दखल घेत त्यांना राहायला घर मिळाल्याची भावना चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होती. तुपे यांची गरिबी आणि वार्धक्यामुळे झालेली हलाखीची परिस्थिती एबीपी माझानं दाखवली होती. त्यानंतर तुपेंच्या मदतीसाठी अनेक संस्था आणि लोक पुढे आले. त्यानंतर त्यांना आज त्यांच्या कर्तृत्वाला साजेसं असं हक्काचं घर मिळालंय..