अमेरिका : नासाने गुरु ग्रहाचे आणखी 12 चंद्र शोधले
Continues below advertisement
गुरु ग्रहाभोवती फिरणाऱ्या 12 चंद्रांचा शोध लागल्याचं नासानं काल जाहीर केलं. त्यामुळ आता गुरुग्रहाभोवती फिरणाऱ्या चंद्रांची संख्या 79 झाली आहे. गुरु ग्रहाभोवती आपल्या सूर्यमालेतील सर्वाधिक चंद्र फिरतात. आतापर्यंत गुरु ग्रहाच्या 53 चंद्रांचं नामकरण झालं आहे. तर 26 चंद्रांचं नामकरण होणं अद्यापही बाकी आहे. नवीन शोधलेल्या चंद्रापैकी ऑडबॉल नावाच्या चंद्राचं संशोधन खास मानलं जात आहे. कारण या चंद्राला आपली कक्षा नसून, तो विविध कक्षेत गुरुभोवती फिरतो. तब्बल 400 वर्षांपूर्वी म्हणजेच 1610 मध्ये गॅलेलियोनं गुरुचा पहिला चंद्र शोधला होता. त्यानंतर अंतराळ विश्वात संशोधनास सुरुवात झाली.
Continues below advertisement