मुंबई : अमेरिकेतील बाजार पडझडीचा झुकरबर्ग आणि वॉरन बफेट यांना फटका
अमेरिकेच्या शेअर बाजारात काल झालेल्या अभूतपूर्व पडझडीचा फटका जगातील दिग्गज उद्योजकांनाही बसला. वॉरेन बफे यांना एका दिवसात ५.३ अरब डॉलर अर्थात सुमारे ३४० अब्ज रुपयांचे नुकसान झालं. वॉरेन बफे हे फोर्ब्सच्या रिअल टाइम रॅकिंगमधले तिसरे श्रीमंत व्यक्ती म्हणून गणले जातात. त्यांनाही अमेरिकेतील शेअर बाजारात झालेल्या उलथापालथीचा मोठा फटका बसला. तर फेसबुकचा सीइओ मार्क झुकरबर्ग याला दिवसभरात ३.६ अब्ज डॉलर्सचा फटका बसल्याची माहिती समोर आलीय. . ३.६ अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे २३० अब्ज रुपयांचे नुकसान झालंय. फेसबुकचे शेअर्स ५ टक्क्यांनी घसरल्याचा फटका मार्क झुकरबर्गला बसला आहे.