यूपीएससीचे यशवंत : कल्याण : पालिका आयुक्तांचा लेक दिग्विजय बोडकेची कामगिरी
"माझे बाबाच माझे रोल मॉडेल आहेत," हे म्हणणे आहे, दिग्विजय बोडके याचे. यूपीएससीच्या निकालात ठाण्यातील दिग्विजय देशातून 54 वा आलाय. दिग्विजयचे वडील स्वतः कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त आहेत. त्यामुळे दिग्विजयला त्याच्या घरातूनच टिप्स मिळत होत्या. विशेष म्हणजे गेल्याच वर्षी दिग्विजयने यूपीएससी दिली होती, त्याची आयपीएससाठी निवड देखील झाली होती मात्र त्याला आयएएस बनायचे होते म्हणून त्याने पुन्हा एकदा यावर्षी प्रयत्न केला. त्यात तो पास देखील झाला. आता तो आयएएस बनलाय.