यूपीएससीचे यशवंत : इंदापूर : पहिल्याच प्रयत्नात मयुर काथवटे परीक्षा पास
यूपीएससी परीक्षेत मूळ बीडचा पण सध्या इंदापूरमध्ये राहणारा मयुर अशोक काथवटे देशात 96 वा तर राज्यात सहावा आला. दीड वर्षांपूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभ्यास सुरु केला आणि पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी झाला. मयुरचे वडील हे शिक्षण अधिकारी म्हणून इंदापूरमध्ये काम करतात.आपल्या बदलीचा परिणाम मुलाच्या अभ्यासावर होऊ नये, म्हणून वडिलांनी कामासाठी ये-जा केली आणि घर एकाच ठिकाणी ठेवलं. पवईच्या आयआयटीतून बी. टेक झाल्यावर मयुर दुबईत नोकरीला लागला. पण आपल्या देशाच्या जनतेची सेवा करणे व शासन लोकाभिमुख बनविण्याचे ध्येय समोर ठेवत त्याने दीड वर्षापूर्वी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अभ्यास सुरु केला अन पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी झाला.