VIDEO | सातारा, मनमाड, पिंपरी आणि चांदवडमध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ | एबीपी माझा
सातारा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये काल पावसानं हजेरी लावली. साताऱ्यातील वाई, पाचगणी, महाबळेश्वरमध्ये गारांसह पाऊस पडला. उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना त्यामुळं काही प्रमाणात दिलासा मिळाला. नाशिक जिल्ह्यातही सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली. मेघ गर्जनेसह चांदवडमध्ये पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. रत्नागिरीतल्या संगमेश्वर तालुक्यातही अवकाळी पाऊस पडला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी, कुडाळ, कणकवली पट्ट्यात अवकाळी पावसामुळे आंबा, काजु उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला आहे.