उत्तर प्रदेश : उन्नाव बलात्कार प्रकरण : भाजप आमदारावरील आरोपांची चौकशी सीबीआय करणार

Continues below advertisement
उन्नाव बलात्कार प्रकरणामुळे टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या योगी आदित्यनाथ यांना अखेर जाग आली आहे. त्यांनी उन्नावचे भाजप आमदार कुलदीपसिंग सेंगर यांच्यावरील बलात्काराच्या आरोपाचं प्रकरण सीबीआयकडे सोपवलं आहे. इतकंच नाही तर एसआयटीने दिलेल्या रिपोर्टच्या आधारे कुलदीप सेंगर यांच्यासह साथीदारांवर गुन्हे दाखल करण्याचेही आदेश दिले आहेत. त्यानंतर याप्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. पोक्सो कायद्यांतर्गत या गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणी योगी सरकारने डॉ.डी.के.द्विवेदी आणि डॉ.प्रशांत उपाध्याय या दोघांना निलंबित केलं आहे. तसंच त्यांची खात्याअंतर्गत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram