UNCUT | माझ्या हाती विरोधी पक्षाची सत्ता द्या, सांताक्रूझमधील राज ठाकरें यांचं संपूर्ण भाषण | ABP Majha
राज्यात सत्ता नको तर विरोधी पक्षाची धुरा आमच्या हाती द्या, असं आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी यांनी मतदारांना केलं आहे. कालची पुण्याची सभा पावसामुळे रद्द झाल्यामुळे मुंबईतील सांताक्रूझ येथे राज ठाकरेंची पहिली प्रचार सभा पार पडली आहे. अवघ्या काही मिनिटात राज ठाकरेंनी आपलं भाषण संपवलं मात्र यामध्ये अनेक विषयांना हात घातला.