Assembly Elections 2019 | राज्यात एकाच टप्प्यात मतदान, 24 ऑक्टोबरला निकाल | ABP Majha
Continues below advertisement
विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार या मिलियन डॉलर प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं आहे. दिवाळीपूर्वीच राज्यात निवडणूक पार पडणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूक 2019 ची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्र आणि हरियाणात 21 ऑक्टोबरला मतदान होईल. तर निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबर रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी आज दिल्लीत याबाबत घोषणा केली.
Continues below advertisement