कल्याण : उल्हासनगरमधील बंद कारखाने उघडून 10 हजारांचा दंड, कारखानदारांचा आरोप
Continues below advertisement
आजपासून राज्यभरात प्लॅस्टिक बंदी लागू झाली असून ठिकठिकाणी प्लॅस्टिकवर कारवाई करण्याचं सत्रही सुरू आहे. मात्र या कारवाईविरोधात उल्हासनगरातल्या प्लॅस्टिक कारखानदारांनी संताप व्यक्त केलाय. बंद असलेले कारखाने उघडून व्यापाऱ्यांना दहा-दहा हजारांचा दंड ठोठावला जात असल्याचं या कारखानदारांचा आरोप असून कारवाईच्या नावाखाली हिटलरशाही सुरू असल्याचा संताप या प्लॅस्टिक उत्पादकांनी व्यक्त केलाय. ही कारवाई न थांबल्यास शेकडो कोटींची उलाढाल असलेले उद्योग राज्याबाहेर नेण्याचा इशाराही कारखानदारांनी दिलाय.
Continues below advertisement