उल्हासनगर : 19 वर्षीय तरुणाकडून 27 लाखांचं परकीय चलन जप्त

Continues below advertisement
उल्हासनगरमध्ये १९वर्षीय तरूणाकडून रेल्वे पोलिसांनी तब्बल २७ लाखांचं परकीय चलन जप्त केलंय.
पियुष कलवानी हा तरूण प्लॅटफॉर्मवरून जात असताना पोलिसानी त्याला पकडलं. तेव्हा त्याची झडती घेतली असता त्याच्या चपलेतून आणि बॅगच्या हँडलमधून डॉलर्सचा अक्षरशः खच पडला.
या नोटा ठाण्याहून एका व्यक्तीने दिल्या असून त्या नागपूरला घेऊन जात असल्याची कबुली पियुषनं पोलिसांना दिली. मात्र ठाण्याहून नागपूरला जाण्यासाठी हा मुलगा उल्हासनगरला का आला, यामध्ये कोणी इतर तरूणही सामील आहेत का, अशा शक्यता आहेत, इडीमार्फत पुढील चौकशी केली जाईल अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram