
उल्हासनगर : पाणी वेळेवर न सोडल्याने इमारतीच्या सेक्रेटरीकडून वॉचमनची हत्या
Continues below advertisement
उल्हासनगरमध्ये पाणी वेळेवर न सोडल्याने सेक्रेटरीकडून वॉचमनची हत्या करण्यात आली आहे. विकास सोनार असं वॉचमनचं नाव आहे. दोन दिवसांपूर्वी खेमाणी परिसरातील मेनका अपार्टमेंटमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मूळचा नेपाळचा असलेला विकास हा याच इमारतीत पार्किंमध्ये राहत होता. सोमवारी त्याने इमारतीत पाणी वेळेवर सोडलं नाही आणि इतर कामंही तो नीट करत नसल्याच्या रागातून इमारतीचा सेक्रेटरी विकी तलरेजा याने विकासला झापलं. यावेळी दोघांमध्ये वाद झाल्याने विकीने विकासचा गळा दाबला आणि त्याची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद केला आहे.
Continues below advertisement