उल्हासनगर : पालिका पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या सुमन सचदेव विजयी
Continues below advertisement
उल्हासनगर महापालिकेच्या पोटनिवडणूकीत राष्ट्रवादीची सरशी झालीये. सत्ताधारी भाजप आणि टीम ओमी कलानीच्या उमेदवाराचा पराभव झालाय. पॅनल क्रमांक १७ साठी झालेल्या पोटनिवडणूकीत राष्ट्रवादीच्या सुमन सचदेव या २ हजार ६९० मतांनी विजयी झाल्यायेत. तर भाजप आणि टीम ओमी कलानीच्या उमेदवार साक्षी पमनानी वलेचा यांचा पराभव झालाय. या निवडणूकीत शिवसेनेनं राष्ट्रवादीच्या उमेदवाराला समर्थन दिलं होतं.
Continues below advertisement