उल्हासनगर : सुपर मार्केटमधील पिठात जिवंत अळ्या सापडल्या
Continues below advertisement
उल्हासनगरच्या सुपरमार्केटमधील पिठात जिवंत अळ्या आढळल्यानं खळबळ उडाली आहे. कॅम्प २ भागात पटेल आर मार्ट नावाच्या सुपरमार्केटची शाखा असून तिथून एका ग्राहकाने पीठ विकत घेतलं होतं. मात्र हे पीठ उघडल्यानंतर त्यात मोठमोठ्या जिवंत अळ्या आढळून आल्या. याबाबत दुकानात जाऊन जाब विचारला असता मॅनेजरने उडवाउडवीची उत्तरं दिली.
Continues below advertisement