VIDEO | 26/11 दहशतवादी हल्लाप्रकरणी 2 पाकिस्तानी अधिकाऱ्यांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट | एबीपी माझा
मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्लाप्रकरणी मुंबईतील सत्र न्यायालयाने पाकिस्तानच्या 2 लष्करी अधिकाऱ्यांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावलं आहे. या प्रकरणात पाकिस्तानी वंशाचा अमेरिकन नागरिक आणि लष्कर ए तोयबाचा अधिकारी डेविड कोलमन हेडीला अमेरिकेत अटक झाली होती. त्यात त्याने पाकिस्तानी लष्करी अधिकारी मेजर अब्दुल रहमान पाशा आणि मेजर इक्बाल यांची नाव घेतली आहेत. त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने या दोघांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावलं आहे.