VIDEO | आधी युतीची रेसिपी सांगा, मगच डिनर डेट | नागपूर | एबीपी माझा
Continues below advertisement
भाजप शिवसेना युती होणार का, यावर जोरदार चर्चा सुरु असताना आता डिनर डिप्लोमसीचा उपाय काढला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार पंतप्रधान मोदी यांच्याकडून उद्धव ठाकरे यांना डिनरचं निमंत्रण देण्यात आलं आहे. मात्र, जोपर्यंत जागांची रेसिपी ठरत नाही तोपर्यंत एकत्र डिनर नाही अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतल्याचं समजलं आहे. त्याचबरोबर मोदींनी मातोश्रीवर येऊन जेवण करावं असं उद्धव ठाकरे यांनी सुचवल्याची माहितीही मिळाली आहे.
Continues below advertisement