VIDEO | मोदींनी मराठवाड्याचाही दौरा करावा, उद्धव ठाकरे यांची मागणी | बीड | एबीपी माझा
पंतप्रधान सोलापुरात येतात, मात्र त्यांनी कधी मराठवाड्याचाही दौरा करावा, दुष्काळानं होरपळलेल्या मराठवाड्यातील लोकांच्या भेटी घ्याव्या, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे. शिवसेनेच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यादरम्यान ते आज बीडमध्ये बोलत होते. यावेळी पीकविम्यामध्ये हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा पुनरूच्चारही ठाकरे यांनी केला. यंदा पाऊस कमी झाल्यानं ऐन हिवाळ्यातच शेतकऱ्यांवर दुष्काळाचं संकट ओढवलंय. त्यामुळे शिवसेनेतर्फे आज मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हौद आणि पाण्याच्या टँकरचं वाटप करण्यात आलं.