VIDEO | बेस्ट संपाबाबत उद्धव ठाकरे महापौर बंगल्यावर दाखल | मुंबई | एबीपी माझा
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपात उडी घेतली आहे. दुपारी उद्धव ठाकरे महापौर, बेस्ट समिती अध्यक्ष आणि आयुक्तांसोबत बैठक घेणार आहेत. यावेळी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात तोडगा काढण्याविषयी ते चर्चा करणार आहेत. त्यामुळे खुद्द उद्धव ठाकरे आता बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाविषयी चर्चेत सहभाग घेत असल्यानं आजतरी तोडगा निघणार का हे पाहणं महत्वाचं आहे.