Uddhav Thackeray UNCUT | कॉंग्रेसमधून विचार गेला, विकार आला : उद्धव ठाकरे | ABP MAJHA
मुंबई : कॉंग्रेसमधून विचार गेला, विकार आला आहे. त्यामुळे तो पक्ष महाराष्ट्रात उरला नाही. महायुतीचं सगळीकडे वातावरण तयार आहे. काँग्रेस पक्ष आता महाराष्ट्रात उरलाच नाही, राष्ट्रवादी काँग्रेसही संपत आली आहे. समोर विरोधी पक्ष राहिला नाही, राष्ट्रवादी काँग्रेसही संपत आली आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. बीकेसीच्या मैदानात आयोजित महायुतीच्या सभेत ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे नेते उपस्थित होते.